Please Download here !!
आता मातीची लाज वाटतेय ?
येसु एक मध्यम वर्गीय शेतकरी 3–4 एकर वडिलोपाजर््ीित जमिनीचा मालक| गेली 3–4 पिढयांपासून त्याच्या कुटुंबात शेती हाच व्यवसाय व शेतीच्या उत्पन्नावरच सर्व गुजराण चालते| यावरच त्याने दोन्ही मुलींची लग्ने व्यवस्थित पणे पार पाडली| दोन्ही मुली सासरी सुखात गुण्या गोविंदात नांदतात| दिनेश त्याचा लहान मुलगा नुकताच 12वी पास होउन का^लेज मध्ये पुढील शिक्षण घेत होता|
जुलै‚ आ^गस्ट शेतक–यांसाठी कामाचे दिवस| शेतात राबायचे दिवस| पिकांनी डोके वर काढले होते| त्या बरोवर गवत पण उगवले होते| दोन दिवस झाले पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने निंदणी करणे जरूरीचे म्हणून येसू दिनेशला म्हणाला|
“दिना‚ आजच्या दिस माह्मासंग शेतावर चाल गडया गवत लर्इ उगवलंय बघ| ते काढाया हवं| निंदणी कराया पायजे| चार बाया बापडया मजुरीने सांगितल्याती| आज दिसभरात काही उरकायच न्हाय अन् आभाLबी भरून आलया| कवाबी देवाचे पानी फुटन बघ| पावसाच्या आत निंदणी व्हाया पायजे| ”
दिनेशला आपल्या वडिलांचे म्हणणे आवडले नाही| त्याला शेतात काम करण्याचा कंटाLा व शेतकामाच्या लाजे खातर तो म्हणाला, “आबा मी आता का^लेजात जातो शाLेत नाही| अभ्यास खूप वाढलाय शिवाय उद्या आमचा क्लास पण आहे| मला शेतावर येणे जमणार नाही|
दिनेशचे बोल एैकून येसू नाराज झाला| त्याला समजावित म्हणाला‚“ आरं बाबा‚ जाशीन कालीजात| तु शिकलास मोठा झालास तर मलाबी अभिमानच हाय की| पण फकस्त एकच दिसाचा परस्न हाय बघÑ येLेत काम होउन जार्इन| मंग तुला परत सांगनार पण न्हाय| ”
दिनेश आपल्या मनातील खरे खरे बोलून गेला “ मला मातीत काम करायची लाज वाटते| कपडे खराब होतात शिवाय मित्र बैलोबा चिडवतात| ”
“ आरं पोरा तु लहान हुता तवा याच मातीत खेLू नग म्हनलं तरी खेLायचा| खेLतांना उचललं तर रडायचा बोमलायचास| मोठा झाला तवा याच मातीच्या गा–यानं रंगपंचमीबी खेLलीया त्वा| तवा तुला लर्इ मजा यायची बघं| या काLया मातीनं पिकवलं कॄपा केलीय म्हनुन तु मोठा झालास| तुझं आजपावतरचं सिक्साण समदं या मातीच्या जोरावरच झालयं| आन् पोरा आपुन रोज भाकर तुकडा खातोय ते काय आभाLातून पडतो काय रं Æ ती भाकरं या मातीतच पिकतीयानं| तु जी चार बुकं लिहितोय वाचतोय त्यो कागुद बी याच मातीत जलमलेल्या झाडांपास्न झालायं बघं| या मातीचं लर्इ उपकार हाय बघं आपल्यावर| तु मी आन् समदं जग कुठं उभ –हायलरंÆ या मातीवरच ना, का आभाLात अधांतरी Æ पोरा तु इतकी गानी गुनगुनतोस एक गानं तुला ठाव हाय का Æ
“माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी
तुझाच आहे अंत वेडया माझ्या पायाशी ”
पोरा तु‚ मी समदे या मातीतच जलमलो आन् मेल्यावर बी या मातीतच जायचं हाय| ही काLी आर्इ हाय|
या जगात हिच्या परिस कोनी बी मोठ न्हायं| हीची महती लय मोठी हाय संपता संपनार न्हाय| अन् या काLया आर्इची सेवा कराया तुला लाज वाटतीया व्हय रंÆ तु तिची सेवा केली तर ती तुला भरभरून आशीर्वाद दिन| तुला लय मो{ करन बघं| तीची सेवा कवाबी वाया जायाची न्हाय| तवा अभिमान सोड आन् माह्मासंग शेतावर चाल|
बापाच्या या शिकवणीने दिनेशचे डोLे उघडले| त्याच्या डोLयावरची धुंदी उतरली| बापाचे म्हणणे व वेLेचे महत्व दिनेशला मनोमन पटले| जर उद्या निंदणी झाली नाही व पाउस सुरू झाला तर शेतामध्ये अजून गवत माजेल व पिकाचे नुकसान होर्इल| तो म्हणाला, “ आबा मी सकाLी लवकर उठेन थोडासा अभ्यास करून शेतावर जार्इन व संध्याकाLी क्लासला जार्इन|”
“शाब्बास रं माझ्या पोरा|” येसूच्या तोंडून गौरवोदगार निघाले|
दिनेशला धन्य वाटले| तो सकाLी लवकर उठला व बापाबरोबर शेतावर गेला| काम करता करता निंदणी करणा–या बायकां समवेत गाणी गात शेतीच्या कामाचा मनसोक्त आनंद लुटला| दुपारी 4 वाजेपर्यंत काम करून शेती व अभ्यास यांचा समन्वय साधत संध्याकाLी 6 वाजता क्लासला गेला|