Please download this here
फजिती
मनी वाटे तिच्या समवेत खूप हिंडावे फिरावे
सहप्रवासाचा आनंद घेत दिवस मजेत घालवावा
ठरले, सर्व काही निश्चित झाले
रविवारचा दिवस, सकाळची वेळ
बस स्थानकावर होर्इल मेळ ¦¦ १ ¦¦
घरी येउन निवांत झालो‚ रविवारची वाट पहात राहिलो
घडयाळाचा कान पिळला
पहाटे पाच चा गजर लावला
सुख स्वप्ने पाहत निद्राधीन झालो ¦¦ २ ¦¦
पहाट झाली महंमद्याचा कोंबडा आरवला
घडयाळाने बर हुकुम गजर केला
पत्नी म्हणाली, ‘अहो उठाना’
वे’ळ टळेल, भेट चुकेल, पदरी निराशा पडेल’ ¦¦ ३ ¦¦
त्वरेने रिक्षा केली बस स्थानकावर पावलो
मजसमान तीचे अनेक चाहते पाहून अचंभित जाहलो
सर्वच ताटकलळले होते,
प्रिय सखीची आतुरतेने वाट पहात होते ¦¦ ४¦¦
ती आली, लाल साडी नेसून, पिवळे ब्लाउज लेउन
लचकत, मान मुरडत मागे पुढे मान वेळावत
डोक्यावर नावाचा बोर्ड मिरवित क़ॅट वॉकचे अविर्भावात
नखरा करित पलॅटफॉर्म वर थांबली ¦¦ ५ ¦¦
तिची ती पाहून अदा लोक झाले फिदा
तिच्या भेटीला आसुसलेले पुढे सरसावले
मागून पुढून जागा मिळेल तेथून प्रवेश करते झाले ¦¦ ६ ¦¦
सर्वाना कवेत घेउन हवेत धूरळा फेकित
माझे तोंडावर काळा धूर ओेकित मला हिणवित
मस्त मजेत वा–याच्या वेगे निघून गेली
मी बापडा एकच वेडा सर्व काही पाहत राहिलो
निराश होउन काळे तोंड घेउन परत आलो ¦¦ ७ ¦¦
पत्नीने विचारले “हे काय सोंग केले”
घडलेले मी कथन करता झालो
पत्नी म्हणाली “कोण ती अवदसा
तुमची केली अशी दशा‚ नाव तिचे सांगा
झिंज्या ओढून पाडते फडशा ” ¦¦ ८ ¦¦
मी हताश होउन बोलता झालो
“ती दुसरी तिसरी कोणी नव्हती
महामंडळाची एस टी बस होती”
पत्नी शांतपणे उद्रगारली,
“अहो गेली ती गेली, तिच्यानंतर दुसरी नव्हती ” ¦¦ ९ ¦¦