Please Download File Here !!
विहंग
हे विहंगा, विविध गुण तव अंगा
सहज कवळीशी आकाशगंगा ॥धृ॥
दोन इवलेसे डोळे, दूर तुझी दॄष्टी
मोहक तुझ्या नयनी साठवीशी सारी सॄष्टी
बलशाली दोन पर, भिरभिरती दिवसभर
घेउनी उंच भरारी गगना घालती आवर
परी न थकती, नसता विश्रांती तसूभर ॥१॥
गोष्ट तुझी खाशी, कुणा न जमली जगती
नसता घडयाळ, नसता गजर
चिवचिवटाच्या मधुर गायने, जागवी दुनिया प्रभाती
रंग तुझा न्यारा सर्वांना प्यारा
रंगात रंग मिसळू नी खुलवी मोर पिसारा ॥२॥
चोच तुझी भारी, गोड घास प्रेमाचा पिलास भरवी
नाही माती नाही चुना ना अवजार
जमवूनी काडी काडी, विणतसे घरटे भारी
धन्य तो विश्वंभर, धन्य तो विधाता
धन्य तयाची करणी, सुखेनैव जगती सारी
देव तारी त्याला कोण मारी ॥३॥