Menu

पुनरारंभ

219387

विनवणी

Please Download File Here !!

          विनवणी

 

गे सरिते कोपू नको, रागावू नको

शांतÊ निर्मळ ख्याती तुझी

गाल बोट त्यासी लावू नको     ॥धॄ॥

पाणी हे जिवन असे, तारतसे मारतसे

पाण्यावाचूनी जिवन हे वाळवंट भासतसे

अनमोल जिवनी या अर्ध्य तू  देउ नको  ॥१॥  गे सरिते

वाट तुझी वाकडी‚ दरी खो­यातूनी काढीशी

पल्लव‚ वॄक्ष‚ लता‚ मैत्री तुझी सर्वांशी

उग्र रूप धारूनिया

सकळ प्राणी मात्रा भय तू देउ नको  ॥२॥  गे सरिते

चाल तुझी डौलदार‚ संथ कुठे धारदार

मारूनी उडया कडे कपारी,  दाविशी रूप ढंगदार

परोपकारा जिवन‚ ब्रीद हे तुझे  विसरू नको  ॥३॥ गे सरिते

स्थान तुझे गिरिजावरी‚ मान तुझा शंभुचे माथी

भविष्य आमचे तुझ्याच हाती‚ आम्ही बाळे लडिवाळे

कनवाळू होउनी आळविती, अंत आमुचा पाहु नको  ॥४॥  गे सरिते

Go Back

Comment