Please Download File Here !!
विकासाचे भूत
विकासाचे भूत मानी बसले
जादूची काडी फिरली अन्
होत्याचे नव्हते झाले ॥धृ॥
दशकापूर्वीचा काळ होता
खडकाळ माळ रान होता
दगड धोंडे पडून होते
रस्ते मातीने माखलेले होते
झाडी झूडपे उन्हात देखिल तग धरून होते ॥१॥
जंगले लोप पावली
मातीची घरे मातीत मिसळली
नूर कसा एकदम पालटला
सिमेंटची जंगले उदयास आली
अकस्मात् हे कसे घडले
शॉपिंग मॉल अन आय टी टॉवर्सची रेलचेल झाली ॥२॥
विकासापोटी खेडी लोपली
शहरामध्ये विलीन झाली
पाणी रस्ते वीज यांची आश्वासने दिली
वर्षे उलटली तरी कागदावरची योजना कागदावरच राहीली
पंत पडले अन दादा चढले ॥३॥