Please Download File Here !!
वाट
ही वाट, दाविते यशाची वाट
लाविते आयुष्याची वाट ॥धृ॥
या वाटेवरती बहु असती सखे सोबती
श्रीमंत‚ गरिब‚ रागीट‚ मवाळ
हुषार‚ मठ्ठ‚ सज्जन‚ दुर्जन
पारख त्यांची करूनी पहा
सज्जन संगत धरूनी रहा ॥१॥
ही वाट वेडी वाकडी
ओलांडुनी जाते कडे कपारी
अवती भवती डोंगर दरी
जीवनी या दु:खे भारी
दु:खात सुख शोधित रहा ॥२॥
अपयश ही यशाची पायरी
यशाची सदैव कास धरी
यत्ने रगडिता वाळूचे कण तेलही गळे
प्रयत्नांती परमेश्वर आहे
प्रयत्ने मिळती गोड फळे
प्रयत्नाची पराकाष्ठा करित रहा ॥३॥
रात्र भागुनी दिवस येतो
अंध:कारा मिटवूनी देतो
नैराश्याला फाटा देउनी
सुखमय जीवन जगत रहा
उज्वल भविष्याची वाट पहा ॥४॥