Please Download File Here !!
मैत्री सागराशी
मावळवता रवि बरेच काही सांगून गेला
रत्नाकराची किमया सांगून गेला ॥धृ॥
जन्म जन्मांतरीची साथ त्याची माझी
सोड म्हणता नाही सुटायची
तोड म्हणता नाही तुटायची
आकाशातले तारे फिरले
पाताळातले पाणी आटले
काळ बदलला, युगे लोटली
मैत्री आमुची अभेद्य राहिली ॥१॥
विशाल हा सागर, रूप त्याचे महाभयंकर
उदात्त शांत गर्भामधे
पाचू माणकाची खाण वसे
घे घेउनी घेशील किती
मनी तयाच्या भिती नसे
दाता तेा विश्वाचा परोपकार धर्म तयाचा
परोपकारा जिवन असे ॥३॥
खारी हवा खारे पाणी वारे खारे खारे
किनारी शोभूनी दिसती
शुभ्रा्र धवल क्षाराची मिठारे
क्षाराची त्या जगती महती
क्षारावाचूनी चवहीन सारे
स्वातंत्रयवीरा काळ कोठडी येथेच दिली
खयाती त्याची जगती झाली ॥३॥
आवसेला घेउनी जातो , पुनवेला देउनी जातो
लख लाख तुला तुझे ते , सर्व समर्पण करूनी देतो
भरती ओहोटी खेळ तयाचा अहोरात्र खेळतसे
सुख दु:खाविन व्यर्थ जिवन खेळामधुनी दावितसे
अलभ्य हे मानव जीवन, मर्म तयाचे जाणूनी घे
क्षण भंगूर हे जिवन असे, कृतार्थ जिवन करूनी घे ॥४॥
