Please Download File Here !!
मामाचा गांव
(चाल : झुक झुक आगीन गाडी, मामाच्या गावाला जाउया ! )
भुर्र ऽ भुर्र ऽ भुर्र ऽ भुर्र ऽ आवाज काढीत
हवेत पेट्रोलचा धूर सोडीत
हवेचे प्रदुषण वाढवू या ॥धृ॥ मामाच्या गावाला जाउया!
मामाचा गाव फार लांब
दिसले हॉटेल तिथेच थंब
चहा नाश्ता करूया ॥१॥ मामाच्या गावाला जाउया !
मामाचा गांव आडवाटा
अगणित खड्डयांचा साठा
हाडे मोडीत जाउया ॥॥२॥ मामाच्या गावाला जाउया !
मामाच्या गावाला धरण
हंडाभर पाण्यासाठी वणवण
फँटा, कोका कोला पिउया ॥॥३॥ मामाच्या गावाला जाउया !
मामाचा गाव कोसभर
मैला मैला वर पथकर
पैसे उधळीत जाउया ॥४॥ मामाच्या गावाला जाउया !
