Please Download File Here !!
माझे मन
माझे मन असे चार चौघांचे जसे
बिशाद काय त्याची शांत कधी बसे ॥धॄ॥
माझे मन चंचल अवखळ पाणी जसे
बांधा धरणे, घाला बांध, फटीतून झिरपतसे
हर्षभरे हरखुनी जाते, दु:खावेगे कष्टी होते
मर्म तयाचे कुणा न कळले हे कसे होतसे ॥१॥
गतकाळाच्या स्मॄति विलक्षण
सय तयाची येता क्षणभर
क्षणात हसते क्षणात रूसते
रूसवा त्याचा काढण्या
कष्ट मज पडतसे ॥२॥
कधी कसे ते प्रेमात पडले
हसले खिदळले प्रेमे न्हाउन निघाले
अवचित असे ते काय घडले
प्रेम बंध तोडूनी तूटूनि गेले
सुकल्या सुमनापरि गळून पडले ॥३॥
माझीया मना थांब जरा थोडा
मम अंगणी बांध तुझा घोडा
अवखळपणा सोडून दे
सुख दु:ख माझे समजून घे
क्षणाची का असेना पण साथ दे ॥४॥
जन्म भरीची साथ तुझी माझी
सोड म्हणता नाही सुटायची
मनात मांडे खाण्याची सवय माझी
स्वप्नात तरी साथ दे
स्वप्न पूर्तीचा आनंद दे ॥५॥