Menu

पुनरारंभ

2 5 3 3 9 2

महागार्इ

 Please Download File Here !!

 महागार्इ

एक आहे सावत्र आर्इ, नाव तिचे महागार्इ

खाउ का ठेउ याची तिला नेहमीच घार्इ   ॥धृ॥

 

भाजी घेण्या मंडर्इत गेलो,  मेथीच्या भाजीचा भाव विचारता झालो

पाच रूपयाची जुडी ऐकून गारच झालो

भाजी वाल्याशी भाव करित म्हणालो

मागील आठवडयात पाच रूपयास दोन होत्या

किमान चार रूपयास एक तरी देना ?

भाजी वाला बोलता झाला, सायेब तो जमाना गेला

महागार्इ लर्इ वाढलिया, त्येल तुप महागलंय, पेट्रोल भडकलंय

तीन रूपडे आमची खरेदी हाय,  एक रूपया गाडीभाड लागतंय

आठ आणे पंचायतीचा कर हाय,  आठ आणे पोटासाठी मागतुया

खर तेच सांगतो सायेब पाच रूपयासबी परवडत न्हाय

सांजच्याला सहा रूपये दिउ नबी भेटणार न्हाय   ॥१॥

 

कापड घेण्या सिंध्याच्या दुकानी गेलो

भाव ऐकून थंडाच पडलो

सिंधी व्यापारी भाषा बोलू लागला

साब कपडा देखो, कपडे का नूर देखो

बढीया कपडा सस्ता दाम,  ग्राहकका फायदा यही मेरा इनाम

मनुष्य स्वभावे भाव करू लागलो

मागील उदाहरणे देत घासाघीस करू लागलो

सिंधी तो सिंधी चातुर्याची शिकस्त केली

शेअर मार्केट गिर गया, सोना आसमान को भीड गया

महागाइची कारणे देत महागडे कापड माझे गळयात मारली  ॥२॥

 

गोष्ट ती नवलाइची, महागार्इ नामक सावत्र आर्इची

घोळात घोळ मोठाघोळ व्यापाराचा बट्टयाबोळ

दुकानदार असो, वा व्यापारी, वा असो नोकरदार

जो तो गातो एकच रडगाणे, वाजवित असतो महागाइचे तुणतुणे 

दुकान चालेना, धंदा होइना, महागाइमुळे काही परवडेना

तरी पण जनसामान्य जगतच आहे,  सावत्र आर्इचा त्रास सहतच आहे 

अशा या जगण्या अंत नाही,अन् कुणाला खंत नाही   ॥३॥

Go Back

Comment

Protected by Mathcha