Menu

पुनरारंभ

2 5 3 3 9 2

मद्यपी

Please Download File Here !!         

 मद्यपी

 

एक मद्यपी मद्य प्राशुनी धुंद झाला

म्हणे भु लोकीच्या जन हो  व्हा बाजूला

औट घटकेचा राजा आला            ॥धृ॥

चालण्यास मला संपूर्ण रस्ता लागतो

कधी उजवीकडे कधी डावीकडे

माझी नागमोडी चाल पाहून, नाग पण लाजतो

चालून चालून पाय माझे दुखतात

मधूनच कधीतरी झोक जाउन पडतो

सरकार दरबारी याची नोंद कधी होणार

सरळ रस्ते बनवायला सरकार कधी शिकणार  ॥१॥

सत्य वदे वचनाला खरे तेच सांगतो

रोज घशाखाली फक्त एकच प्याला टाकतो

मदिरा टाळक्यात शिरल्यावर तोल माझा जातो

राजा पासून रंका पर्यंत सर्वांना शिव्या घालतो

पोलीस शांतता भंगाचा कलम लावतात

हप्ता वेळेवर मिळाल्यावर सलाम ठोकतात   ॥२॥

म्हणे निवडणुकीला उभा राहीन

दारूची बाटली निशाणी घेर्इन

मला तुम्ही हात द्या

दारू (बंदी) ला साथ द्या

परवाने देउन महसूल वाढविन

‘पडिले वळण’ म्हणून

सायंकाळळी फक्त एकच पेला चढविन               ॥३॥

Go Back

Comment

Protected by Mathcha