Please Download File Here !!
भजी
एक होती आजी म्हणे बाळा करूया का भजी
नातू म्हणे नको आजी हॉटेलात जाउन खाउ या ताजी ॥धृ॥
बेत ठरला नातू अन आजी हॉटेलात गेली
2 प्लेट गोल भजी आॅर्डर दिली
भजी आली चव चांगली लागली
आजी वेटरला म्हणाली, सांग तू कशी केली,
वेटर म्हणाला आजी तेवढे विचारू नका
गुपित आमचे उघडे करू नका ॥१॥
आजीने आग्रह धरला वेटर बोलता झाला
खरे सांगू आजी ती होती शिळी भजी
परत तेलात तळून केली ताजी
आजी म्हणाली जळलं मेलं तुझ लक्षण
वेटर उत्तरला आथी सांगितले असते
तर केले असते का भक्षण ? ॥२॥
नातवाने मागविली पालक भजी
आजी म्हणाली फारच चवदार झाली
परत वेटरला कॄति विचारली
सांगू का नको वेटरला पंचार्इत आली
वेटर म्हणे भजीला वापरली सडलेली भाजी
काळजी करू नका‚ काही होणार नाही आजी ॥३॥
