Menu

पुनरारंभ

2 5 3 3 9 2

देवाचं पानी

Please Download File Here !!

देवाचं पानी

 

देख वं बहीनं देवाचं पानी उनं

तुले‚ माले, हयाले‚ त्याले अन् समद्यानले सुखावनं  ॥ धॄ,॥

धरनी माय उन्हानं कावली

देवाच्या पान्यानं कशी सुखावली

काया मायेच्या पोटात बीज रूजलं

कोवळ अंकुर अवनीवर अवतरलं   ॥१॥

बयीराजाले ते लर्इच भावलं

पोटच्या पोरावानी त्याले जपलं

खत खावाडलं‚ पानी पिवाडलं

गुराढोरापासून वाचिवलं

जीव लावून त्याले मोठं केलं   ॥२॥

काया माय़॓ची माया बी गहरी

देवाच्या पान्यानं दिली उभारी

दिसापरीस रोप वाढलं

फळा फुलांनी बघ कसं तरारलं    ॥३॥

 

बघता बघता रूप कसं पालटलं

पांढरा कापूस‚ हिरवी केळी‚ मोत्यावानी ज्वारी

काया मायनं जनू रंगीत लेनं पांघरलं

घामाचं मोती झालं‚ तुह्य़ा माह्य़ा कष्टाले फळ मियालं ॥४॥

Go Back

Comment

Protected by Mathcha