Menu

पुनरारंभ

219388

जीवन गाणे

Please Download File Here !!

 

        जीवन गाणे

 

कालचक्र ते भिर भिर भिरते

नवनविन घडवून जाते, इतिहासाला उजळून देते

जन्म दिन अन्य नसे तो

इतिहासातील एक शुभ दिवस असे तो

कालपरत्वे उगवलेल्या दिनी या

घडी हर घडी अनुभवांची शिदोरी बांध

शुभ अशुभ चांगले वार्इट क्षण वेचुन

आयुष्याच्या वाटेवर यशाची संधी साध ॥१॥

आशेवरती जीवन जगतो,भलेपणाचे स्वप्न रंगवितो

कठिण समयी “दुर्भाग्य“ म्हणोनी भाग्यासी कोसतो

भाग्य दुर्भाग्य खेळ असे तो

भाग्य तुझे ते तुझ्याच हाती, अपयश येता बावरू नको

आज शुभदिनी या संकल्प करू

सत्कर्माची कास धरू, सत्कर्म योगे संसार सावरू ॥२॥

रात्रभागूनी दिवस येतो ,सूर्य किरण सोनेरी फेकित जातो

सुख दु:खाचे मौज मजेचे सात रंग ते तयात दडले

शोध शोधुनी कुणा न कळले ,संगत तयांची करूनी रहा

क्षण आनंदाचे मौज मजेचे वेचित रहा

नैराश्याला फाटा देउनी सुखमय जीवन जगत रहा ॥३॥

Go Back



Comment