Please Download File Here !!
घडयाळ
घडयाळाचे काटे स्वत:भोवती फिरतात
पळभर विश्रांती‚ थोडा थांबा हे शब्द त्यांचे गावीच नसतात ॥धृ॥
घडयाळाचे काटे फिरफिरतात
12 वरून पुन्हा 12 वरच येतात
वर्तमानास कलाटणी देउन
भविष्याचा भूत बनवितात
वेळेचे भान तेच ठेवतात
बरहुकुम गजर करून
गत काळ परतणार नाही सूचित करतात ॥१॥ घडयाळाचे काटे
भविष्याचा वेध कुणा न कळला
कोणता क्षण वार्इट कोणता चांगला
थांग याचा कुणा न लागला
घडी हर घडी जिवनाशी नाते
एक ठोका चुकला तर जिवन वाया जाते ॥२॥ घडयाळाचे काटे
ठोक्यावर ठोके टाकित जातात
हर पल नया पल बनवित जातात
प्रत्येक क्षण मोलाचा आनंदाचा
फायदा ज्याने उचलला तोच ठरला भाग्याचा ॥॥३॥ घडयाळाचे काटे
सूज्ञ मानवा वेLेचे महत्व जाणून घे
क्षण आला तो सूखेनैव भोगून घे
प्रेम दे प्रेम घे प्रेमाने जग जिंकून घे
एकमेव संदेश त्याचा अर्थ याचा समजून घे
वॄथा वेL दवडू नको जिवनाचे सोने करून घे
अजरामर हो}नी जगती ख्याती पसरू दे È 4 घडयाळाचे काटे
