Menu

पुनरारंभ

2 5 3 3 9 2

गडया

Please Download File Here !!

गडया

 

ऐका ना गडया

सांगतो मी कहानी दगडया

म्हणू नका मजला रडया            ॥धृ॥

 

रस्त्यावर पडलो

पायदळी तुडवलो

वाहनांखाली भरडलो

मनी खूप चरफडलो

याला काय जिवन म्हणायचे गडया     ॥१॥

 

जन्म माझा विसरलो

शापित होउनी भू वरी पडलो

प्राभु चरणस्पर्शे पावन झालो

भू लोकी अजरामर झालो

पुसता पुसेना दगडावरच्या रेघा       ॥२॥

   

टाकीचे घाव मी सोसिले

जाते पाटा वरवंटाचे रूपात आलो

धान्य‚ कडधान्य‚ मिरची‚ मसाले पिसले

आदि मानवां पासून करित आलो सेवा

यात माझे काय चुकले गडया          ॥३॥

रस्त्याच्या कडेला गुमान उभा राहतो

उन  वारा  पाउस  थंडी सोसतो

पांथस्थांना मार्ग दावितो

माझे इशा-यांवर तुम्ही चालता

दावलेला रस्ता कधी चुकलाय का गडया  ॥४॥

निर्जीव निश्चल पत्थर मी, शेंदूर मला फासला

बांधले सुंदर मंदिर, देव म्हणती मजला

लाचार होउनी अर्पिती पैसा अडका

आळविती मजला, म्हणती देवा दु:ख माझे ऐका

आता तुम्हीच सांगा गडया, मी रडया की मानव रडया ॥५॥

Go Back

Comment

Protected by Mathcha