Menu

पुनरारंभ

2 5 5 3 9 8

क्षितीज

Please Download File Here !!

 क्षितीज

 

दूरवर मी पाहता आकाश जमिनीला टेकलेले

कुठे डोंगर तर कुठे टेकडयांनी उचललेले

तर कुठे खोल दरित घुसलेले

दूरवर त्याचे गाव क्षितीज तयाचे नाव ॥१॥

 

मनी वाटे गावी तयाचे जावे

मौज मजा करूनी परतावे

उदयोन्मुख उदयास्त रविच्या

लाल गोLयाशी खेळावे

मनसोक्त रविकरिणी न्हाउनी यावे  ॥२॥

मार्ग तयाचा अडचणीचा , दरी खो­याचा

काटया कुटयाचा ,रानावनातुनी जाण्याचा

फिर फिर फिरलो

वाट संपता संपेना गाव त्याचे सापडेना

काय करावे समजेना कोठे  जावे उमजेना

फिरून फिरून दमलो भोपळे चौकात परतलो

प्रश्न सारे एकदम सुटले कोडे मग उमगले

भु–गोल आहे  क्षितीज एक कल्पना आहे ॥३॥

Go Back

Comment

Protected by Mathcha