Menu

पुनरारंभ

219401

आशिष

Please download File Here !!

आशिष

 

फुल उमलले फुल उमलले

सुगंधे त्याच्या आसमंत बहरले ¦¦ धॄ|¦¦

 

पहिले वहिले फुल ते

वेलीवर उमलले

मायबाप आजी आजोबा मामा मावशा

भ्रामर रूपे फेर धरोनी गुण गुणू लागले ¦¦ 1 ¦¦

 

काय तयाचे कवतिक

भान हरपूनी पाहती एकटक

दारी परस दारी शेजारी अंगणी माजले स्तोम

नामे तयाला म्हणती ओम           ¦¦ 2 ¦¦

 

कुणी म्हणती नंद कुणी आनंद

नंद आनंद एकच खरा

आमचा आपला श्री गणेशरूपी ओमच बरा

रिध्दी सिध्दीचा नायक

बालक रूपे अवतरला आमच्या घरा  ¦¦ 3 ¦¦

 

फुलल्या फुला आशिष काय दे}

रडो पडो झडो आनंदे बागडो

आयुष्य आमचे तयाला जडो

यशाच्या शिखरावर मात करोनी

सदानंदाची ध्वजा फडफडो           ¦¦ 4 ¦¦

Go Back

Comment