Menu

पुनरारंभ

219385

आरती परिक्षा देवीची

Please Download File here !!

आरती परिक्षा देवीची

जय देवी जय देवी जय परिक्षाबार्इ गे परिक्षा तार्इ

तुझे दर्शनमात्रे मन बावरूनी जार्इ जयदेवी जय देवी ॥१॥

मराठीचा पेपर पडता हातात

माझे डोळे तार्इ पांढरे होतात

विचार करतो पण मज सुचेना काही ॥१॥तुझे दर्शनमात्रे

वाटे उद्या हिंदी पेपर असेल बरा

पेपर पाहताच उतरे चेहरा

कॉपी करणेसाठी मन धाव घेर्इना ॥२॥तुझे दर्शनमात्रे

इंग्लीश गणित तर महा चांडाळ

पेन ठेवोनी जपावी माळ

इकडे तिकडे मन मग होइ प्रवाही ॥३॥तुझे दर्शनमात्रे

भूगोल सायन्सची मज होती आशा

पण शेवटी पदरी पडली निराशा

निराशेत मग झोप ना येर्इ  ॥४॥तुझे दर्शनमात्रे

पाव तार्इ तुला नारळ फोडिन

नाहीतर तुझ्यास्तव डोके झोडिन

हाक दीन भक्ताची ऐक तु आर्इ ॥५॥तुझे दर्शनमात्रे

Go Back

Comment