Menu

पुनरारंभ

2 5 5 3 9 8

आघाउपणा

Download this file here !!

          आघाउपणा

 

मी एक आघाउ कर्तव्य समजून कर्म करतो

अंगाशी येता शहाणपणा ठरतो               ॥धृ॥

 

पावसाळयाचे दिवस होते नदी नाले तुडुंब भरून वाहत होते

नाल्यात एक बालक वाहत होते  कुणाचे त्याकडे लक्ष नव्हते

माझी कर्तव्य भावना जागॄत झाली  तत्क्षणी पाण्यात उडी घेतली

पाण्याचा अंदाज नव्हता  पोहण्याचे ज्ञान नव्हते

उमगले तेव्हा पाय गाळात,   रूतले होते

मेलो² मेला² वाचवा² वाचवा² धावा केला

गावक­यांनी दोर सोडला  लाख मोलाचा जीव माझा वाचला

एकजण खुलासा करता झाला

प्रवाहात वाहणारे बाळ नव्हते, वाहत आलेले गाठोडे होते

यावर माझा शहाणपणा काढीत म्हणाला

पोहता येत नाही तर गेला कशाला मरायला  ॥१॥मी एक आघाउ

 

दोन दारूडयांची आपसात जुंपली, एकमेकावर कुरघोडी केली

शांतता प्रिय मी दोघांमथ्ये पडलो, शांततेचे आवाहन करू लागलो

माझे प्रयत्न निष्फळ ठरले, दोघे इरेला पेटले

आपसातील वाद विसरून, दोघांनी मलाच चेपले

उणे पूरे ते काय राहिले,  पोलीसांनी मलाच पकडले

शांतता भंग करणेचा कलम लावून मला बदडले

लाख मोलाचा सल्ला मला दिला

जमत नाही तर गेला कशाला कडमडायला ॥२॥ मी एक आघाउ

 

वाहक व प्रवासी भांडत होते, सुटे पैसे देणे क्षुल्लक कारण होते  

वाद विकोपाला जात होता, बसला उशीर होत होता

मी बापडा मध्ये बोलता झालो,  वाद संपविणेचा प्रयत्न करू लागलो

सुदैवाने मजजवL पुरेशी नाणी निघाली,  प्रांजलपणे वाहकास दिली

उभयतांमधला वाद मिटला, पुढची तिकीटे काढतांना ती ही संपली

माझे तिकीट काढतांना पुन्हा सुटे पैशाचा प्रश्न आला

वाहकाने माझ्याच तिकीटावर शेरा मारला

४-५ दिवसांनी डेपोमधून उरलेले पैसे घेउन जा

माझा आघाउपणा येथे पण नडलाÊ कर्तव्य पुर्तीचा धडा मिळाला ॥३॥ मी एक आघाउ                                                                                                      

Go Back

Comment

Protected by Mathcha