Menu

पुनरारंभ

219377

अधूरी भेट

Download this file here !!

अधूरी भेट

सोन्याचा गोळा गगनी उगवला

लाल पिवळा होउनी भुतळी अवतरला ।धृ।

दाराची फट, खिडकीचे पडदे, छताचे छिद्र

जागा मिळेल तिथून डोकावू लागला

रविचे ते वागणे मला न पटले

त्रागा करोनी दार उघडले ।१।

 

निर्लज्ज तो रवि दार उघडताच आत आला

नि:संकोच घरभर फिरू लागला

धाडस करोनी बोलता झालो

कोण हवे ते विचारता झालो

दार ठोठवावे,  काॅलबेल वाजवावी, आवाज द्यावा

साधे शिष्ट संमत आचार नाही का तुजला? ।२।

 

बोलणे माझे नजर अंदाज करता झाला

रजनी कोठे? प्रतिप्रश्न मज केला

मी म्हणालो रात्र भागली निद्रा संपली

चंद्रा संगे रजनी गेली

खट रवि तो ढम्म उभा राहिला

म्हणे असा मी तळपत राहिन

वाट तिची पाहत राहिन  ।३।

 

प्रतिक्षा त्याची खूप लंाबली

मध्यान्ह होता आग पाखडली

वाट पाहूनी पाय त्याचे थकले

पश्चिमेकडे केव्हा वLले त्याचे त्यालाच न कळले

रागाचा पारा खाली उतरला

क्षितिजावर जाउन शांत निमाला

जाता जाता म्हणे असा कसा जार्इन

उद्या प्रभाती परत येर्इन  ।४।

Go Back

Comment